जर तुम्ही 12 हजार रुपयांच्या बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Redmi 13 5G उत्तम पर्याय ठरू शकतो. रेडमी 13 5G मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4 जनरेशन 2 AE प्रोसेसरसह 6.79 इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले दिला आहे. फ्लिपकार्टवर किंमतीत कपात आणि बँक ऑफरचा लाभ मिळत आहे. येथे आम्ही तुम्हाला रेडमी 13 5G वर मिळणाऱ्या डील्स आणि ऑफर्स विषयी सविस्तर माहिती देत आहोत.
Redmi 13 5G किंमत आणि ऑफर्स
फ्लिपकार्टवर Redmi 13 5G चा 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 12,499 रुपयांत सूचीबद्ध आहे, तर गेल्या वर्षी जुलैमध्ये तो 13,999 रुपयांना लाँच झाला होता. बँक ऑफरबाबत सांगायचे झाल्यास, IDFC FIRST पॉवर विमेन प्लॅटिनम आणि सिग्नेचर डेबिट कार्डने पेमेंट केल्यास 5% तात्काळ सूट (750 रुपयांपर्यंत) मिळू शकते, ज्यामुळे प्रभावी किंमत 11,874 रुपये होईल.
Redmi 13 5G ची वैशिष्ट्ये
Redmi 13 5G मध्ये 6.79 इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले असून त्याचा रिझोल्यूशन 2460 x 1080 पिक्सेल, रिफ्रेश रेट 120Hz, स्क्रीन-टू-बॉडी प्रमाण 91% आणि पीक ब्राइटनेस 550 निट्सपर्यंत आहे. डिस्प्ले संरक्षणासाठी फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 दिला आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4 जनरेशन 2 AE प्रोसेसर आहे, ज्यासोबत अॅड्रिनो 613 GPU आहे. फोनमध्ये दिलेली इनबिल्ट स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येऊ शकते. हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित Hyper OS ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.
कॅमेरा सेटअपबाबत बोलायचे झाल्यास, Redmi 13 5G च्या मागील बाजूस 108 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा दिला आहे. तर सेल्फी व व्हिडिओ कॉलसाठी 13 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये 5,030mAh बॅटरी असून ती 33-वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि इन्फ्रारेड सेन्सर दिला आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 3.5mm ऑडिओ जॅक, USB Type-C पोर्ट, 4G, 5G, ब्लूटूथ आणि वाय-फाय यांचा समावेश आहे. डिमेनशन्सबाबत सांगायचे झाल्यास, या फोनची लांबी 168.60 मिमी, रुंदी 76.28 मिमी, जाडी 8.30 मिमी आणि वजन 205.00 ग्रॅम आहे.
हे पण वाचा :- Alcatel V3 सिरीज लॉन्च, 108MP कॅमेरा आणि एका क्लिकमध्ये स्क्रीन बदलण्याचा फीचर मिळणार





