Realme GT 7, GT 7T भारतात विक्रीस सुरू, 7000mAh बॅटरीसह सुसज्जित, ६ हजार रुपयेपर्यंत स्वस्तात खरेदी करण्याची संधी!

Realme GT 7 आणि Realme GT 7T फोन आता भारतात खरेदीस उपलब्ध आहेत. कंपनीने या दोन्ही स्मार्टफोनस गेल्या आठवड्यात भारतात लाँच केले होते. Realme GT 7 Dream Edition देखील याच सोबत सादर करण्यात आला असून तो जूनपासून खरेदीस मिळणार आहे. रियलमी GT 7 मध्ये MediaTek Dimensity 9400e चिपसेट दिला आहे. तर Realme GT 7T फोनमध्ये MediaTek Dimensity 8400-Max चिपसेट आहे. फोनमध्ये 7,000mAh ची बॅटरी असून 120W फास्ट चार्जिंगची सोय आहे. Realme GT 7 मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आहे, तर रियलमी GT 7T मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा आहे.

Realme GT 7, Realme GT 7T भारतातील किंमत, विक्री ऑफर्स

रियलमी GT 7 आणि रियलमी GT 7T ची विक्री भारतात सुरू झाली आहे. हे फोन Realme India च्या वेबसाइटवर आणि Amazon वर खरेदी करू शकता. रियलमी GT 7 ची किंमत 8GB RAM + 256GB व्हेरिएंटसाठी रु. 39,999 पासून सुरू होते, तर 12GB + 256GB व्हेरिएंट रु. 42,999 मध्ये खरेदी करू शकता. त्याचा 12GB + 512GB व्हेरिएंट रु. 46,999 मध्ये उपलब्ध आहे. फोन IceSense Black आणि IceSense Blue या रंगांमध्ये येतो. ग्राहकांना फोन खरेदीवर 3000 रुपयांचा त्वरित सूट आणि 5000 रुपयांचा एक्सचेंज सूट मिळू शकतो.

रियलमी GT 7T ची किंमत पाहिली तर 8GB RAM + 256GB मॉडेल रु. 34,999 मध्ये खरेदी करता येते. तर 12GB + 512GB RAM चा टॉप व्हेरिएंट रु. 41,999 मध्ये उपलब्ध आहे. हा फोन IceSense Black, IceSense Blue आणि Racing Yellow या रंगांमध्ये खरेदी करता येतो. कंपनी फोन खरेदीवर 3000 रुपयांचा बँक सूट देत आहे आणि याशिवाय एक्सचेंज बोनस म्हणून रु. 6000 ची सूट देखील देत आहे.

Realme GT 7T
GT 7T

Realme GT 7, Realme GT 7T स्पेसिफिकेशन्स

Realme GT 7 मध्ये 6.78 इंचांचा 1.5K (1264 x 2780 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले आहे, ज्याची पीक ब्राइटनेस 6000 निट्स आहे. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 360Hz टच सॅम्पलिंग रेट दिला आहे. त्यात MediaTek Dimensity 9400e चिपसेट आहे. स्क्रीनवर Corning Gorilla Glass 7i प्रोटेक्शन आहे. स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. यात 50 मेगापिक्सल Sony IMX906 1.56 इंच प्रायमरी कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. त्याची 7,000mAh बॅटरी 120W चार्जिंगला सपोर्ट करते.

रियलमी GT 7T मध्ये सिम, सॉफ्टवेअर, बॅटरी आणि सेल्फी कॅमेर्‍याबाबत तेच आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.80 इंच (1280 x 2800 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले असून 120Hz रिफ्रेश रेट आणि 360Hz टच सॅम्पलिंग रेट आहे. यामध्ये प्रोसेसर म्हणून MediaTek Dimensity 8400-Max वापरलेला आहे. GT 7T मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा आहे. 50 मेगापिक्सल Sony IMX896 1.56 इंच प्रायमरी कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा OV08D10 अल्ट्रा-वाईड अँगल कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

हे पण वाचा :- लीक झालेल्या iPhone 17 Pro Max च्या व्हिडिओतून फोनचा पहिला लूक समोर आला