6000mAh बॅटरी, 32 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला Realme C73 5G लाँच, सर्व माहिती जाणून घ्या

Realme ने भारतीय बाजारात आपला नवीन किफायती स्मार्टफोन Realme C73 5G लाँच केला आहे. C73 5G मध्ये 6.67 इंचाची HD+ IPS LCD डिस्प्ले आहे. या फोनच्या मागील बाजूला f/1.8 अपर्चरसह 32 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा दिला आहे. यामध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 6300 6nm प्रोसेसर वापरला आहे. येथे आम्ही तुम्हाला Realme C73 5G चे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती देत आहोत.

Realme C73 5G किंमत

Realme C73 5G चा 4GB+64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10,499 रुपये असून 4GB+128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,499 रुपये आहे. रंगांच्या पर्यायांमध्ये हा फोन झेड ग्रीन, क्रिस्टल पर्पल आणि ऑनिक्स ब्लॅक मध्ये उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टसह कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ऑफलाइन स्टोअर्सवरही खरेदीसाठी उपलब्ध आहे. लाँच ऑफर अंतर्गत सर्व बँकांच्या कार्डांनी पेमेंट केल्यास 500 रुपये फ्लॅट सवलत मिळू शकते.

Realme C73 5G स्पेसिफिकेशन्स

Realme C73 5G मध्ये 6.67 इंचाची HD+ IPS LCD डिस्प्ले असून त्याचा रिझोल्यूशन 720×1604 पिक्सेल आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. यात ऑक्टा-कोर मीडियाटेक डाइमेंसिटी 6300 6nm प्रोसेसर आणि आर्म माली-G57 MC2 GPU दिला आहे. यात 4GB LPDDR4X RAM आणि 64GB / 128GB UFS 2.2 स्टोरेज आहे, जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 2TB पर्यंत वाढवता येऊ शकते. हा फोन Android 16 आधारित Realme UI 6.0 वर चालतो. या फोनमध्ये 15W फास्ट चार्जिंगसह 6000mAh ची बॅटरी आहे.

कॅमेरा सेटअपबाबत बोलायचे झाले तर C73 5G च्या मागील बाजूला f/1.8 अपर्चरसह 32 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि सहायक कॅमेरा आहे. तर सेल्फी व व्हिडिओ कॉलिंगसाठी f/2.0 अपर्चरसह 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. यात साईड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. डिझाइनबाबत, या फोनची लांबी 165.7 मिमी, रुंदी 76.22 मिमी, जाडी 7.94 मिमी आणि वजन 197 ग्रॅम आहे. या फोनला धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP64 रेटिंग मिळाली आहे. तसेच सैन्यस्तरीय टिकाऊपणासाठी MIL-STD 810H सर्टिफिकेशनही आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G SA, ड्युअल 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ 5.3, GPS, GLONASS, Galileo, QZSS आणि USB टाइप-C पोर्ट यांचा समावेश आहे.

हे पण वाचा :- 7000mAh बॅटरी असलेला Oppo K13 5G फोनची किंमत मोठ्या प्रमाणावर घसरली, मोठा प्राइस कट