Google Store launched in India: गूगलने भारतात आपला अधिकृत ऑनलाइन स्टोअर लॉन्च केला आहे. यामुळे आता तुम्ही Pixel डिव्हाइसेस थेट कंपनीकडून खरेदी करू शकता. खरेदीसाठी सोयीस्कर बनवण्यासाठी गूगलने अनेक पेमेंट पर्यायही दिले आहेत. आतापर्यंत गूगलचे प्रोडक्ट्स भारतात थेट कंपनीकडून विकले जात नव्हते.
कंपनी थर्ड पार्टी सेलर्सवर अवलंबून होती. अधिकृतरितीने Flipkart गूगलचे Pixel फोन भारतात विकत होता. मात्र कंपनी भारतीय बाजारपेठेत आपली उपस्थिती वाढवत आहे. नुकताच कंपनीने भारतात आपल्या फोन्सचे उत्पादनही सुरू केले आहे.
Google Store बंपर ऑफर उपलब्ध
Google Store वरून ग्राहक स्मार्टफोन, TWS ईअरबड्स आणि स्मार्टवॉच खरेदी करू शकतात. कंपनी म्हणते की अधिकृत स्टोअरमधून खरेदी केल्याने ग्राहकांना मोठा फायदा होतो. ग्राहकांना फक्त प्रामाणिक उत्पादनेच मिळणार नाहीत, तर त्यांना फ्लेक्सिबल पेमेंट आणि खास ऑफर्सही मिळतील.
गूगलने एका ब्लॉग पोस्टद्वारे सांगितले की Google Store वरून डिव्हाइस खरेदी केल्यास ग्राहकांना ऑफर्स मिळतील. ग्राहक डिस्काउंट, गूगल स्टोअर क्रेडिट किंवा तत्काळ कॅशबॅक यांसारख्या ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात. शिवाय, तुम्ही जुनी डिव्हाइसेस ट्रेड-इन करू शकता. कंपनी उत्तम एक्सचेंज ऑफर देते.
स्वस्तात खरेदी करता येणार
कंपनी Pixel 9 वर ६ हजारांचा एक्सचेंज बोनस देत आहे. तर Pixel 9 Pro वर १२ हजार आणि Pixel 9 Pro Fold वर १५ हजार रुपयांचा डिस्काउंट देत आहे. कंपनी विविध मॉडेल्सवर १५ हजार रुपयांपर्यंतचा गूगल स्टोअर डिस्काउंट देत आहे. यात इंस्टंट डिस्काउंटसह बँक ऑफरही समाविष्ट आहे.
Pixel 9a वर कंपनी ३ हजार रुपयांचा कॅशबॅक देते, ज्यामुळे फोनची किंमत ४६,९९९ रुपये होते. तर Pixel 9 वर ५ हजार रुपयांचा डिस्काउंट आणि ७ हजार रुपयांचा कॅशबॅक मिळतो, ज्यामुळे फोन ६७,९९९ रुपयांत खरेदी करता येतो. प्रो वेरिएंटवर २० हजार रुपयांचा ऑफर असून फोन ८९,९९९ रुपयांत मिळतो.
Pixel 9 Pro XL वर १० हजार रुपयांचा स्टोअर डिस्काउंट आणि १० हजार रुपयांचा इंस्टंट कॅशबॅक मिळतो. तसेच Pixel 9 Pro Fold वरही हा ऑफर लागू आहे. Pixel 8a वर १५ हजार रुपयांचा स्टोअर डिस्काउंट आणि ३ हजार रुपयांचा इंस्टंट कॅशबॅक मिळतो.
Pixel 8 Pro वर ३७,००० रुपयांचा स्टोअर डिस्काउंट आणि ७ हजार रुपयांचा इंस्टंट कॅशबॅक आहे. म्हणजेच फोनवर एकूण ४२ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळतो. डिस्काउंटनंतर हा फोन ६२,९९९ रुपयांत खरेदी करता येतो. कंपनी EMI चा पर्यायही देते. डिव्हाइसेस खरेदीवर स्टोअर क्रेडिटही मिळतो.
नो कॉस्ट EMI
२४ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट EMI चा पर्याय
निवडक खरेदींसाठी स्टोअर क्रेडिट
निवडक क्रेडिट कार्ड वापरून व्यवहारावर तत्काळ कॅशबॅक
पात्र डिव्हाइसवर एक्सचेंज बोनस
हे पण वाचा :- Samsung Galaxy S25 Edge ची डिलिव्हरी सुरू, मिळतो 200MP चा कॅमेरा, किंमत इतकी आहे





