EPFO News: एम्प्लॉईज प्रोविडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) ने फेब्रुवारी 2024 मध्ये आर्थिक वर्ष 2024-25 साठी 8.25% व्याजदर जाहीर केला होता. मात्र, अद्याप सर्व EPF खातेदारांच्या खात्यात ही व्याजरक्कम ट्रान्सफर झालेली नाही. अनेक सदस्य अजूनही त्यांच्या खात्यात ही रक्कम कधी येईल याची वाट पाहत आहेत.
EPF चा व्याज उशिराने जमा झाल्यास कर्मचार्यांना तोटा होतो का?
EPF व्याज जमा होण्यात उशीर सहसा प्रशासनिक प्रक्रियेमुळे होतो. सरकारची अधिकृत अधिसूचना (Official Notification) न येईपर्यंत EPFO व्याजाची रक्कम खात्यांत ट्रान्सफर करत नाही. त्यामुळे प्रत्येक वर्षी व्याज जमा होण्यास काही वेळ लागतो.
तथापि, याचा तुमच्या एकूण रिटर्नवर परिणाम होत नाही. EPF योजना 1952 च्या परिच्छेद 60 नुसार, व्याजाची गणना प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशीच्या बॅलन्सवर केली जाते, पण त्याचे पेमेंट संपूर्ण आर्थिक वर्षाच्या शेवटी एकत्रितपणे केले जाते.
याचा अर्थ असा की, व्याज जमा उशिरा झाले तरी त्याची गणना प्रत्येक महिन्याच्या बॅलन्सवर आधीच केली गेली असते, त्यामुळे EPF सदस्याला कोणताही आर्थिक तोटा होत नाही. प्रत्येक महिन्याच्या गणनेसह संपूर्ण व्याजाची रक्कम शेवटी तुमच्या खात्यात जमा केली जाते.
अशा प्रकारे तपासा पीएफ बॅलन्स EPFO News
UMANG अँपद्वारे EPF बॅलन्स तपासण्याची पद्धत –
UMANG अँप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड आणि इन्स्टॉल करा (Google Play Store किंवा App Store वरून डाउनलोड करता येईल)
- अँप उघडा आणि तुमचा मोबाईल नंबर वापरून नोंदणी करा
- मेन्यूतून “EPFO” हा पर्याय निवडा
- नंतर “View Passbook” वर टॅप करा
- आता तुमचा UAN (Universal Account Number) भरा आणि Get OTP वर टॅप करा
- मोबाईलवर आलेला OTP भरा आणि Login करा
- त्यानंतर तुमची EPF पासबुक आणि बॅलन्सची माहिती स्क्रीनवर पाहू शकता.
EPFO पोर्टलवरून EPF पासबुक तपासण्याची प्रक्रिया –
- सर्वप्रथम EPFO च्या संकेतस्थळाला भेट द्या.
- “Services” मेनूमधून “For Employess” विभाग निवडा.
- त्यानंतर “Member Passbook” वर क्लिक करा (किंवा थेट passbook.epfindia.gov.in वर जा)
- आता तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड भरा.
- लॉगिन केल्यानंतर तुमच्या सर्व कंपन्यांच्या EPF पासबुक्सची यादी दिसेल.
- एखाद्या कंपनीच्या नावावर क्लिक करून तुम्ही त्याची पासबुक आणि बॅलन्स पाहू शकता.
हे पण वाचा :- केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा धक्का बसेल का? दुसऱ्या सहामाहीसाठी मिळत आहेत संकेत





