Eicher Motors Q4 results 2025: रॉयल एनफील्ड (Royal Enfield) बनवणारी कंपनी आयशर मोटर्स (Eicher Motors) ने आज म्हणजेच बुधवार, 14 मे रोजी आर्थिक वर्ष 2025 च्या चौथ्या तिमाहीसाठी आपल्या निकालांची घोषणा केली. या दिग्गज ऑटो कंपनीने आर्थिक वर्ष 25 च्या चौथ्या तिमाहीत 1,362 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला. तर आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीसाठी कंपनीचा निव्वळ नफा 1,070 कोटी रुपये होता. अशा प्रकारे वार्षिक आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात सुमारे 27 टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली आहे. दरम्यान, कंपनीच्या ऑपरेशन्समधील महसूलातही वार्षिक 23 टक्क्यांची वाढ झाली असून तो 5,150 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
लक्षवेधी बाब म्हणजे, कंपनीने मनीकंट्रोलच्या सर्वेक्षणानुसार ब्रोकरेजने दिलेल्या सरासरी 20.6 टक्क्यांच्या वाढीच्या अंदाजापेक्षा जास्त निव्वळ नफा मिळविला आहे. ऑपरेशन्समधील महसूलही मनीकंट्रोल पोलमधील 5,072 कोटी रुपयांच्या अंदाजापेक्षा जास्त आहे.
70 रुपयांचा डिविडेंड देण्याचा निर्णय Eicher Motors Q4 results
चौथ्या तिमाहीच्या निकालांसोबतच कंपनीने 70 रुपये प्रति इक्विटी शेअरचा अंतिम डिविडेंड जाहीर केला आहे. डिविडेंड मिळवण्यासाठी पात्र असलेल्या शेअरधारकांची यादी तयार करण्यासाठी नोंदणीची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.
दरम्यान, कंपनीचा एकूण खर्चही वाढला आहे. वार्षिक आधारावर कंपनीचा एकूण खर्च सुमारे 27 टक्क्यांनी वाढून 4,200 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तसेच आर्थिक वर्ष 2025 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीने EBITDA मध्येही वाढ नोंदवली आहे. चौथ्या तिमाहीतील EBITDA मध्ये 11.4 टक्क्यांची वार्षिक वाढ झाली असून तो 1,258 कोटी रुपये आहे.
या तिमाहीत सर्वाधिक विक्री रॉयल एनफील्डची
माहितीप्रमाणे, रॉयल एनफील्डने या चौथ्या तिमाहीत 2,80,801 मोटरसायकली विकल्या आहेत. इतक्या वाहनांची विक्री करताना कंपनीने आतापर्यंतची सर्वात जास्त तिमाही विक्री नोंदवली आहे. ही विक्री आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत 23 टक्क्यांहून अधिक आहे.
Disclaimer: येथे दिलेली माहिती केवळ माहितीसाठी आहे. येथे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की बाजारातील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदार म्हणून पैसे गुंतवण्यापूर्वी नेहमी तज्ञांचा सल्ला घ्या. बुलमराठी कधीही कोणालाही येथे पैसे गुंतवण्याचा सल्ला देत नाही.
हे पण वाचा :- कंपनी प्रत्येक शेअरवर 60 रुपये डिविडेंड देणार, निव्वळ नफा 16% वाढून ₹556 कोटी झाला





