Oppo K13 5G Price Cut: Oppo ने नुकताच लॉन्च केलेल्या 7000mAh क्षमतेच्या दमदार बॅटरी असलेल्या फोनची किंमत मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात आली आहे. हा फोन 256GB स्टोरेजसह अनेक जबरदस्त फीचर्ससह उपलब्ध आहे. Oppo K सीरीजचा हा नवीनतम फोन कंपनीने एप्रिलमध्ये लॉन्च केला होता. Flipkart या ई-कॉमर्स वेबसाइटवर चालू असलेल्या End of Season Sale मध्ये हा फोन लॉन्च किंमतीपेक्षा हजारो रुपये स्वस्त मिळत आहे. चला, या फोनवर मिळणाऱ्या डीलबद्दल जाणून घेऊया…
Oppo K13 5G ची किंमत मोठ्या प्रमाणावर घसरली
Oppo K13 5G दोन स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे – 8GB RAM + 128GB आणि 8GB RAM + 256GB. या फोनची सुरुवातीची किंमत 17,999 रुपये आहे. तर, त्याचा टॉप व्हेरिएंट 19,999 रुपयांमध्ये मिळतो. हा फोन दोन रंगांमध्ये खरेदी करता येतो – आईसी पर्पल आणि प्रिझम ब्लॅक. Flipkart वर चालू असलेल्या सेलमध्ये या फोनवर खरेदी करताना 1,500 रुपये पर्यंतचा तात्काळ बँक डिस्काउंट मिळत आहे. तुमच्याकडे जुना स्मार्टफोन असल्यास, तुम्ही त्याचा एक्सचेंज करून अर्ध्या किमतीच्या किंवा त्याहून कमी किमतीत हा फोन घेऊ शकता. शिवाय नो-कॉस्ट EMI चा देखील लाभ घेता येईल.

Oppo K13 5G चे फीचर्स
- Oppo चा हा फोन 6.7 इंचाच्या HD+ AMOLED डिस्प्लेसह येतो, जो 120Hz हाय रिफ्रेश रेट सपोर्ट करतो.
- याच्या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 1200 निट्सपर्यंत आहे. तसेच यामध्ये वेट हाताने टच आणि ग्लोव्ह मोड फीचर्सही उपलब्ध आहेत.
- हा बजेट 5G फोन Qualcomm Snapdragon 6 Gen 4 प्रोसेसरवर चालतो.
- यात 8GB RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेज सपोर्ट आहे, ज्याला मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येईल. गेमिंग कार्यक्षमता वाढवण्यासाठी फोनमध्ये वेपर कूलिंग (VC) चेंबर दिला आहे.
- या स्मार्टफोनच्या मागील बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP मुख्य आणि 2MP सेकंडरी कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 16MPचा कॅमेरा दिला आहे.
- हा फोन Android 15 वर आधारित ColorOS 15 वर चालतो. याशिवाय, हा बजेट फोन AI फीचर्सने सुसज्ज आहे.
- यात 7,000mAh क्षमतेची दमदार बॅटरी असून 80W SuperVOOC USB Type C चार्जिंग फीचर आहे.
हे पण वाचा :- OPPO A6i 5G चे स्पेसिफिकेशन्स समोर आले, या लिस्टिंगमध्ये दिसल्या डिटेल्स





