7200mAh मोठी बॅटरी, 144Hz डिस्प्ले, Dimensity 9400e प्रोसेसरसह Realme Neo7 Turbo चीनमध्ये लॉन्च

Realme ने 27 मे रोजी भारतीय बाजारात Realme GT 7 सिरीज लाँच केली होती. आता त्यांच्या होम मार्केट चीनमध्ये Realme Neo7 Turbo फोन सादर झाला आहे. या फोनमध्ये ट्रान्सपेरेंट डिझाइन असून एक वेगळा आणि अनोखा लूक दिला आहे. यामध्ये ग्राहकांना 16GB पर्यंत रॅम, IP68/69 रेटिंग, 50 मेगापिक्सेल रियर कॅमेरा, 7200mAh मोठी बॅटरी, मीडियाटेक Dimensity 9400e चिपसेट यांसारख्या अनेक वैशिष्ट्यांचा फायदा मिळतो. चला तर, या फोनच्या सर्व स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीबाबत जाणून घेऊया.

Realme Neo7 Turbo स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले:

Realme Neo7 Turbo मध्ये 6.78 इंचाचा 1.5K OLED डिस्प्ले दिला आहे, जो 2800×1280 पिक्सेल रिझोल्यूशन, 144Hz रिफ्रेश रेट आणि 100% DCI-P3 कलर गमटला सपोर्ट करतो. याची ब्राइटनेस लोकल लेवलवर 6500nits आणि ग्लोबल लेवलवर 2000nits पर्यंत जाते. त्याचबरोबर यात 4608Hz हाय फ्रिक्वेंसी PWM डिमिंग आणि फुल ब्राइटनेस DC डिमिंगचा समावेश आहे, ज्यामुळे डोळ्यांवर कमी ताण येतो.

प्रोसेसर आणि परफॉर्मन्स:

हा स्मार्टफोन लेटेस्ट 4nm तंत्रज्ञानावर बनलेला MediaTek Dimensity 9400e प्रोसेसरसह येतो, जो 3.4GHz पर्यंत क्लॉक स्पीडवर कार्य करतो. ग्राफिक्ससाठी यात Immortalis-G720 MC12 GPU वापरले आहे. यामध्ये GT परफॉर्मन्स इंजिन 2.0 चा सपोर्टही आहे, जो गेमिंग आणि मल्टिटास्किंग उत्कृष्ट बनवतो.

रॅम आणि स्टोरेज:

फोनमध्ये 12GB आणि 16GB पर्यंत LPDDR5X रॅम दिली आहे आणि स्टोरेजमध्ये 256GB, 512GB आणि 1TB पर्यंत UFS 4.0 तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

Neo7 Turbo
Neo7 Turbo

ऑपरेटिंग सिस्टम:

Realme Neo7 Turbo फोन Android 15 आधारित realme UI 6.0 वर चालतो, ज्यामध्ये नवीन इंटरफेस आणि अनेक स्मार्ट फिचर्स आहेत.

कॅमेरा:

फोटोग्राफीसाठी Realme Neo7 Turbo मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP Sony IMX882 प्रायमरी लेंस आहे, जो OIS (ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन) सह येतो. तसेच 8MP 112° अल्ट्रा-वाइड कॅमेरा दिला आहे. समोर 16MPचा कॅमेरा आहे. रियर कॅमेरा 4K 60fps पर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो.

बॅटरी आणि चार्जिंग:

Realme Neo7 Turbo मध्ये 7200mAh मोठी Titan बॅटरी आहे, जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही फक्त 19 मिनिटांत 50 टक्के पर्यंत चार्ज होते.

डिझाईन आणि बिल्ड:

फोनचा डिझाईन ट्रान्सपेरेंट बॅकसह आहे, ज्यावर क्रिस्टल एंग्रेव्ड टेक्सचर आणि Flash DART लोगो आहे. तसेच डस्ट आणि वॉटरप्रूफसाठी फोनला IP66, IP68 आणि IP69 रेटिंग मिळाली आहे.

इतर फिचर्स:

फोनमध्ये इन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर, इन्फ्रारेड सेन्सर, X-axis लीनियर मोटर, ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स आणि Hi-Res ऑडिओ सपोर्ट आहे. त्याचबरोबर USB Type-C ऑडिओ पोर्टही आहे.

कनेक्टिव्हिटी:

कनेक्टिव्हिटीसाठी हा डिव्हाइस 5G SA/NSA, ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi 7 (802.11 be), Bluetooth 5.4, 360° NFC आणि USB Type-C पोर्टसह येतो. नेव्हिगेशनसाठी यात क्वाड-बँड Beidou, ड्युअल-फ्रिक्वेंसी GPS, GLONASS, Galileo, QZSS आणि NavIC सपोर्ट आहे.

Neo7 Turbo
Neo7 Turbo

Realme Neo7 Turbo ची किंमत आणि उपलब्धता

  • Realme ने Neo7 Turbo चीनमध्ये चार स्टोरेज व्हेरियंट्समध्ये लॉन्च केला आहे.
  • बेस व्हेरियंट 12GB रॅम + 256GB ची किंमत 1,999 युआन, म्हणजे सुमारे 23,710 रुपये आहे.
  • 16GB रॅम + 256GB स्टोरेज असलेल्या व्हेरियंटची किंमत 2,299 युआन, अंदाजे 27,270 रुपये आहे.
  • 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज असलेला मिड मॉडेल 2,499 युआनमध्ये उपलब्ध असून त्याची भारतीय किंमत सुमारे 29,650 रुपये असू शकते.
  • टॉप-एंड व्हेरियंट 16GB रॅम + 512GB स्टोरेज 2699 युआन म्हणजे सुमारे 32,025 रुपये आहे.
  • फोनची विक्री चीनमध्ये 31 मे पासून सुरू होणार असून प्री-ऑर्डर आजपासून सुरु आहे.

हे पण वाचा :- 7000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरासह Realme GT 7T गेमिंग स्मार्टफोन लॉन्च, किंमत जाणून घ्या