TATA मोटर्सचा मोठा निर्णय! FIAT कडून हे खास इंजिन विकसित करण्याचा परवाना घेतला, जाणून घ्या फायदा काय होणार

Tata Fiat Engine Agreement: देशातील प्रमुख वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने आज एक मोठी यशस्वी पायरी चढली आहे. कंपनीने फिएटच्या 2.0-लीटर मल्टीजेट डिझेल इंजिनच्या विकास आणि अपग्रेड करण्याचा परवाना मिळवून घेतला आहे. ऑटो उद्योगात टाटाचा हा निर्णय कंपनीचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. कारण टाटा मोटर्स बराच काळापासून या मल्टीजेट इंजिनचा वापर आपल्या हॅरियर आणि सफारी SUV सारख्या वाहनांमध्ये करत आहे.

ऑटोकारच्या अहवालानुसार, टाटा मोटर्सने आता या इंजिनचा परवाना विकत घेतला आहे. हे इंजिन फिएट इंडिया ऑटोमॉबाईल प्रायव्हेट लिमिटेड (FIAPL) कडून स्टेलंटिसच्या परवान्याखाली बनवले जाते. त्याचे उत्पादन रंजनगाव येथे टाटा मोटर्स आणि स्टेलंटिसच्या संयुक्त उद्यम प्लांटमध्ये होते. आता या इंजिनला पुढे विकसित करण्याचा अधिकार टाटा मोटर्सला मिळाला आहे, ज्यामुळे कंपनी स्वतंत्रपणे आपल्याला हवे तितके या इंजिनचे डिझाईन आणि विकास करू शकेल.

टाटा मोटर्सच्या प्रवक्त्याने सांगितले, “टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स (TMPV) आणि स्टेलंटिस यांनी आर्थिक वर्ष 2025 च्या चौथ्या तिमाहीत परवाना तंत्रज्ञान करार केला आहे. हा करार FAM B 2.0-लीटर डिझेल इंजिनमध्ये काही विकास आणि तांत्रिक बदल करण्याचा अधिकार देतो.”

TATA मोटर्सला याचा काय फायदा होणार?

टाटा मोटर्ससाठी ही डील अत्यंत योग्य वेळेस झाली आहे. कारण टाटा मोटर्स या 2.0-लीटर मल्टीजेट डिझेल इंजिनचा वापर आणखी वाढवण्याची योजना आखत आहे. सांगितले गेले आहे की, या आर्थिक वर्षात लॉन्च होणारी आगामी सिएरा ही देखील या डिझेल इंजिनसह बाजारात येईल. टाटाला हा डिझेल इंजिनचा परवाना मिळाल्यामुळे, कार उत्पादकाकडे आता भविष्यातील उत्सर्जन मानकांनुसार इंजिन सुधारणा करण्याची आणि अपग्रेड करण्याची पूर्ण स्वातंत्र्य आहे.

कठोर उत्सर्जन नियम असूनही डिझेल वाहनांची मागणी सतत वाढत आहे. याआधी, या पॉवरट्रेनवर कोणतेही अपग्रेड किंवा री-कॅलिब्रेशन करण्यासाठी स्टेलंटिसकडून मंजुरी घ्यावी लागायची, ज्याचा खर्च फार मोठा होता. अहवालानुसार, ECU मॅपिंगमध्ये मामूली बदलासाठीही टाटाला 10 दशलक्ष युरो (सुमारे 96.92 कोटी रुपये) खर्च करावा लागत होता.

या वाहनांमध्येही वापरले जाते हे इंजिन:

फिएट हे इंजिन जीप कम्पास आणि मेरिडियनसाठी वापरते, तसेच एमजी मोटर इंडियाला हेक्टर आणि हेक्टर प्लससाठी पुरवठा करते. सध्या अशी माहिती नाही की, एमजी मोटर इंडियाला टाटा मोटर्सने विकसित केलेले अपग्रेडेड इंजिन मिळेल की नाही. तसेच, पुढील वर्षी एमजी मोटर डिझेल इंजिन व्हेरिएंट बंद करण्याचीही बातमी आहे.

हे पण वाचा :- Nissan Magnite CNG | ‘आम्ही कुठेही जाणार नाही’, अफवा खंडित करत निसानने लाँच केली सीएनजी SUV