Alcatel V3 सिरीज लॉन्च, 108MP कॅमेरा आणि एका क्लिकमध्ये स्क्रीन बदलण्याचा फीचर मिळणार

Alcatel V3 Ultra price in India: Alcatel ने भारतीय बाजारात पुनरागमन करत तीन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. हे तीनही फोन Alcatel V3 सिरीजचा भाग असून दमदार फीचर्ससह येतात. कंपनीने Alcatel V3 Classic, V3 Pro आणि V3 Ultra हे मॉडेल्स सादर केले आहेत.

V3 Ultra मध्ये स्टायलस सपोर्ट आणि NXTPAPER 4-in-1 सारखे फीचर्स दिले गेले आहेत. NXTPAPER ही पेटंट केलेली तंत्रज्ञान असून फोन वापरताना डोळ्यांवर होणारा ताण कमी करते. यामुळे तुम्ही स्क्रीन वेगवेगळ्या मोडमध्ये सहज बदलू शकता. चला तर मग या फोनच्या किंमती आणि वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊयात.

Alcatel V3 किंमत किती आहे?

Alcatel V3 Classic ची कंपनीने सुरुवातीची किंमत 12,999 रुपये ठेवली आहे. ही किंमत फोनच्या 4GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी आहे. तर 6GB RAM + 128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे. हा फोन कॉस्मिक ग्रे आणि हॉलो व्हाइट रंगांमध्ये उपलब्ध आहे. तर प्रो व्हेरिएंट माचा ग्रीन आणि मेटॅलिक ग्रे रंगांत सादर केला आहे.

प्रो व्हेरिएंट फक्त एकच कॉन्फिगरेशनमध्ये येतो, म्हणजे 8GB RAM + 256GB स्टोरेज, ज्याची किंमत 17,999 रुपये आहे. Alcatel V3 Ultra ची किंमत 19,999 रुपयांपासून सुरू होते. ही किंमत 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी आहे. 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे.

Alcatel V3 सिरीजची विक्री 2 जूनपासून सुरू होणार आहे. हे फोन तुम्ही Flipkart वरून खरेदी करू शकता. तसेच या स्मार्टफोनवर 2000 रुपयांचा बँक डिस्काउंट किंवा एक्सचेंज बोनसही मिळेल.

Alcatel V3 Series
V3 Series

स्पेसिफिकेशन्स काय आहेत?

Alcatel V3 Classic मध्ये 6.67 इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर आहे. फोनची स्टोरेज मायक्रो SD कार्डच्या मदतीने 2TB पर्यंत वाढवता येते. हा डिव्हाइस Android 15 OS सह येतो.

यामध्ये 50MP + 0.08MP QVGA ड्युअल रियर कॅमेरा आहे. फ्रंटमध्ये कंपनीने 8MP कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 5200mAh बॅटरी आणि 10W चार्जिंग सपोर्ट आहे. टाइप-सी चार्जिंग आणि ड्युअल स्पीकरसारखे फीचर्सही आहेत.

Alcatel V3 Pro मध्ये 6.67 इंचाचा HD+ NXTPAPER डिस्प्ले आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर दिला आहे. यात 50MP + 5MP रियर कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा आहे. डिव्हाइस 5010mAh बॅटरी आणि 18W चार्जिंगसह येतो. सिक्युरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.

Alcatel V3 Ultra मध्ये 6.78 इंचाचा FHD+ NXTPAPER डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर आहे. यातही स्टोरेज वाढवण्याचा पर्याय आहे. फोनमध्ये eSIM सपोर्टही उपलब्ध आहे.

हा फोन Android 15 सह येतो. यात 108MP + 8MP + 2MP ट्रिपल रियर कॅमेरा आणि 32MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 5010mAh बॅटरी आणि 33W चार्जिंग सपोर्ट आहे. तसेच साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.

हे पण वाचा :- Huawei Nova 14 Ultra | 5500mAh बॅटरी, 100W चार्जिंग आणि 1TB स्टोरेजसह, किंमत ऐकून थक्क व्हाल