iQOO Neo 10 5G Smartphone Launched: मिड-रेंज सेगमेंटमध्ये iQOO ने पुन्हा एकदा जोरदार एन्ट्री केली आहे. फोन निर्माता कंपनीने आज भारतात आपला नवीन स्मार्टफोन iQOO Neo 10 5G लॉन्च केला असून तो फ्लॅगशिप स्तरावरील परफॉर्मन्स देणारा फोन म्हणून ओळखला जात आहे. दमदार प्रोसेसर, शक्तिशाली बॅटरी आणि जबरदस्त डिस्प्लेने सजलेला हा फोन गेमिंग आणि परफॉर्मन्स प्रेमींना खास भेट ठरू शकतो.
यामध्ये 144Hz रिफ्रेश रेटसह 1.5K डिस्प्ले, Snapdragon 8s Gen 4 प्रोसेसर आणि iQOO Supercomputing Chip Q1 अशी तंत्रज्ञान वापरलेली आहे. कॅमेर्याच्या दृष्टीने, यात 50MP प्रायमरी रिअर कॅमेरा आणि 32MP फ्रंट कॅमेरा आहे, जो AI फीचर्ससह सुसज्ज आहे. येथे या नवीन फोनच्या किंमतीसह इतर वैशिष्ट्यांची माहिती वाचा.
iQOO Neo 10 ची वैशिष्ट्ये
iQOO Neo 10 मध्ये 6.78 इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले दिला आहे. यामध्ये वापरकर्त्यांना 144Hz रिफ्रेश रेटचा डिस्प्ले मिळतो. तसेच 5500 निट्सची पीक ब्राइटनेस उपलब्ध आहे.

iQOO Neo 10 चा प्रोसेसर
iQOO Neo 10 मध्ये Octa Core Snapdragon 8s Gen 4 प्रोसेसरसोबत Adreno 825 GPU वापरला आहे. वापरकर्त्यांना 8GB ते 16GB LPDDR5x अल्ट्रा रॅम पर्याय उपलब्ध आहेत. तसेच कंपनीने 128GB UFS 3.1 पासून ते 512GB UFS 4.1 स्टोरेज पर्याय दिले आहेत.
बॅटरी आणि चार्जिंग
या फोनमध्ये 7000mAh क्षमतेची मोठी बॅटरी आहे, जी 120W फास्ट चार्जिंगद्वारे केवळ 36 मिनिटांत 0 ते 100% पर्यंत चार्ज केली जाऊ शकते.
कनेक्टिव्हिटी आणि इतर वैशिष्ट्ये
फोनमध्ये Wi-Fi 7, IR ब्लास्टर, NFC, आणि 16 5G बँड्सचा सपोर्ट आहे. तसेच कंपनीने 3 वर्षे Android अपडेट्स आणि 4 वर्षे सिक्योरिटी अपडेट्स देण्याचे वचन दिले आहे.
किंमत आणि ऑफर्स
ग्राहकांसाठी कंपनीने हा फोन 4 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध करून दिला आहे. बेस व्हेरिएंटची किंमत 31,999 रुपये असून टॉप व्हेरिएंटची किंमत 40,999 रुपये आहे. खाली व्हेरिएंटनुसार किंमतीची माहिती पाहा.
8GB RAM + 128GB स्टोरेज – 31,999 रुपये
8GB RAM + 256GB स्टोरेज – 33,999 रुपये
12GB RAM + 256GB स्टोरेज – 35,999 रुपये
16GB RAM + 512GB स्टोरेज – 40,999 रुपये

बुकिंग आणि ऑफर्स
आज दुपारी 1 वाजल्यापासून iQOO Neo 10 5G फोनसाठी प्री-बुकिंग सुरू झाली आहे. सेल 2 जून रोजी (प्री-बुकिंग ग्राहकांसाठी) आणि 3 जूनपासून सर्वांसाठी उपलब्ध होईल. लॉन्च ऑफर अंतर्गत iQOO TWS 1e ईयरबड्स फ्री दिले जातील.
निवडक कार्डवर शॉपिंग केल्यास 2000 रुपये सूट
iQOO Neo 10 5G खरेदी करताना निवडक कार्डांद्वारे पेमेंट केल्यास 2000 रुपयांचा तात्काळ सवलत मिळेल. HDFC, SBI आणि ICICI बँक कार्ड वापरकर्त्यांना हा डिस्काउंट दिला जात आहे. iQOO Neo 10 5G हा बजेटमध्ये उच्च दर्जाची परफॉर्मन्स हवी असलेल्या वापरकर्त्यांसाठी उत्तम पर्याय ठरतो.
हे पण वाचा :- Oppo Reno 14: लॉन्च झाला 50MP सेल्फी कॅमेरा, 6000mAh बॅटरी आणि शानदार डिझाइन





