PM Ujjwala Yojana: दीर्घ काळानंतर गेल्या एप्रिल महिन्यात केंद्र सरकारने LPG सिलेंडरच्या किमती वाढवल्या होत्या. त्यानुसार ग्राहकांसाठी LPG सिलेंडरच्या किमतीत ५० रुपये वाढ झाली. मात्र, या वाढी असूनही काही ग्राहकांना ३०० रुपये पर्यंत स्वस्त गॅस सिलेंडर मिळत आहे. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
कोणत्या ग्राहकांना फायदा?
खरं तर, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) च्या लाभार्थ्यांना LPG सिलेंडरवर ३०० रुपयांची सबसिडी मिळते. त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या तुलनेत PMUY लाभार्थ्यांना ३०० रुपयांपेक्षा अधिक फायदा होतो. सध्या उज्ज्वला योजनेअंतर्गत सिलेंडरची किंमत ५५० रुपये आहे, तर सामान्य ग्राहकांसाठी ही किंमत ८५३ रुपये आहे.
PM Ujjwala योजनेबद्दल
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १ मे २०१६ रोजी केली होती. या योजनेअंतर्गत सरकारने गरिब कुटुंबांना ५ कोटी LPG कनेक्शन देण्याचे लक्ष्य ठेवले होते. नंतर हे लक्ष्य वाढवून ८ कोटी केले गेले, जे ७ सप्टेंबर २०१९ रोजी सात महिने आधीच पूर्ण झाले.
ऑगस्ट २०२१ मध्ये PMUY फेज २ (उज्ज्वला २.०) सुरू करण्यात आला आणि जानेवारी २०२३ पर्यंत १.६० कोटी उज्ज्वला २.० कनेक्शन जारी झाले आहेत. याशिवाय, सप्टेंबर २०२३ मध्ये सरकारने अतिरिक्त ७५ लाख PMUY कनेक्शन जारी करण्यास मंजुरी दिली. जुलै २०२४ पर्यंत हे ७५ लाख कनेक्शन जारी करण्याचे काम पूर्ण झाले असून आता देशभरात १० कोटींपेक्षा अधिक लाभार्थी आहेत. लक्षात घ्या की, PMUY कनेक्शनसाठी आवश्यक कागदपत्रांसह www.pmuy.gov.in वर ऑनलाइन अर्ज करता येतो.
PM Ujjwala Yojana अटी कोणत्या?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत. अर्जदार भारताचा नागरिक असावा. तसेच, अर्जदार BPL (गरीबी रेषेखालील) कुटुंबाचा सदस्य असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराकडे आधीपासून LPG कनेक्शन नसावे. आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, राशन कार्ड आणि बँक खाते तपशील यांचा समावेश आहे.
हे पण वाचा :- PM Kisan Yojana | पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता कधी येईल, यादीत आपले नाव कसे तपासायचे





